हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचा रत्नागिरीत उत्साह
१०० संस्था, चित्ररथांचा सहभाग
पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित
रत्नागिरी :ग्रामदैवत श्री देव भैरी, श्री भैरीबुवा पालखी स्व. अरुअप्पा जोशी चित्ररथ, स्वयंभू काशिविश्वेश्वर देवस्थान, विठ्ठल मंदिर संस्था, विक्रांत मित्रमंडळ, एमएससीआयटी, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळ, शिवानी ग्रुप गवळीवाडा, समस्त रत्नागिरी कुंभार समाज परिवार, अखिल हिंदू गणेशोत्सव पतितपावन मंदिर, श्रीराम मंदिर संस्था, राष्ट्रीय सेवा समिती, श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था, श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज मंडळ, सागरी सीमा मंच छत्रपती व मावळे, जाकिमिऱ्या शिमगोत्सव, जाकीमिऱ्या मच्छीमार सोसायटी, मिऱ्या ते पंधरामाड ग्रामस्थ, खल्वायन संस्था, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, तालुका भंडारी समाज, ब्रह्मरत्न, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, श्री सिद्धिविनायक चक्रीभजन मंडळ, स्वामी समर्थ, विश्व हिंदू परिषद, ब्रह्मनाद ढोलताशा पथक, जायंट्स क्लब ऑफ रत्नागिरी, संस्कार भारती, कांदळवन प्रतिष्ठान, गंगावेस तालीम देवरुख ओझरखुर्द, दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग.
मारुती मंदिर येथून सहभागी चित्ररथ- घोडेस्वार, भारत माता, स्वामी विवेकानंद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक केंद्र (दिंडोरीप्रणित), कोकणचा राजा मित्रमंडळ पॉवरहाऊस, पालखी व ढोलपथक, ओम साई मित्रमंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्व पुस्तकाचा देखावा, पावनखिंड, सायकलिस्ट क्लब, श्री मरूधर विष्णू समाज, ढोलपथक ओम साई चाळकेवाडी, संस्कृत भारती, पांचाळ सुतार समाज चित्ररथ, इस्कॉन रथ, पाटीदार सनातन समाज, नवलाई ढोल पथक, आकार डान्स अॅकॅडमी, गो सेवा संघ, राजरत्न प्रतिष्ठान, हर्षा मोटार ट्रेनिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुरक्षित वाहन चालवण्याचे मार्गदर्शन करणारा रथ, हिंदू जनजागृती समिती, लाठीकाठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रजापिता ब्रह्मकुमारी, जय भैरी मित्रमंडळ मिरजोळे- कुवारबाव, शिवरुद्रा ढोल पथक.
